चटपटीत भरली मिरची (stuffed chillies)

साहित्य - 

१. भजीच्या मोठ्या मिरच्या ७ 

२. दाण्याचा कूट ७ चमचे

३. तिखट अर्धा चमचा

४. मीठ चवीनुसार

५. अर्ध्या लिंबाचा रस 

६. तेल ४ चमचे 

७. धणेपूड दीड चमचा

८. जिरेपूड एक चमचा 


कृती - 

मिरच्या धुवून कोरड्या करून घ्याव्या. त्याला एका बाजूने चीर पाडून त्यातील सर्व बिया काढून टाकाव्या. एका भांड्यात दाण्याचं कूट, तिखट, मीठ, धणेपूड, जिरेपूड, लिंबाचा रस व २ चमचे तेल टाकून कालवून घ्यावे. हे मिश्रण आता सर्व मिरच्यांमध्ये सारखे भरून घ्यावे. तवा तापत ठेवावा. त्यावर एक चमचा तेल पसरवून घ्यावे. आता अलगद सर्व मिरच्या तव्यावर ठेवाव्या. झाकण ठेवून मंद आचेवर २-३ मिनिटे शिजू द्यावे. आता झाकण काढून तेल टाकून मिडियम आचेवर सर्व बाजूंनी मिरच्या छान काळपट भाजून घ्याव्या. ह्या मिरच्या जेवतांना भाकरीबरोबर तोंडी लावण्यास सर्व्ह कराव्या. 

Comments