ब्रेडचा केक / bread cake





साहित्य -  

१. ब्रेडचा चुरा ३ वाटी
२. मैदा १ वाटी
३. साजूक तूप ४ चमचे
४. पिठी साखर १ वाटी
५. मनुका १० 
६. बदाम १० 
७. व्हॅनिला इसेन्स १ चमचा
८. बेकिंग सोडा १ चमचा
९. बेकिंग पावडर अर्धा चमचा
१०. दुध आवश्यकतेनुसार 

कृती - 

एका भांड्यात बदाम वगळून बाकीचे सर्व साहित्य एकत्र करावे. नीट एकजीव करून घ्यावे. मिश्रण थोडे पातळसर करावे. घट्ट करू नये. आता एका केकच्या भांड्याला तूप लावून घ्यावे. त्यात मिश्रण ओतून वरून बदामाचे तुकडे टाकणे. एका स्टीमर मध्ये पाणी घेऊन केक ४० ते ४५ मिनिटे स्टीम करण्यास ठेवावा. स्टीमर नसेल तर एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळावे. त्यावर चाळणी ठेऊन त्यावर केकचे भांडे ठेऊन पातेल्यावर झाकण ठेवणे. शिजल्यावर केक मध्ये चाकू टाकून पाहणे. चाकुला केक चीकटल्यास अजून शिजू देणे.




Comments