मिक्स ड्रायफ्रुट चिक्की / mix dryfruit chikki




साहित्य –

१. गुळ ५०० ग्राम
२. अक्रोड ३ वाट्या
३. पिस्ता १ वाटी
४. बदाम २ वाट्या
५. वेलचीपूड १ चमचा
६. साजूक तूप ३ चमचे
७. काजू १ वाटी 

कृती –

सर्व ड्रायफ्रुट्सचे तुकडे करून ५ मिनिटे भाजून घेणे. एका नॉनस्टिक भांड्यात तूप गरम करणे. त्यात गुळ विरघळवून घेणे. एका काचेच्या ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यात गुळाचे २-३ थेंब टाकून पाहणे. जर गुळ खाली बसला तर गुळात लगेच वेलचीपूड टाकून मिक्स करून त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स टाकून gas बंद करणे. ढवळून घेणे. एका ताटाला तूप लावून त्यात अलगद ते मिश्रण टाकून पसरवून घेणे. ३-४ मिनिटांनी त्याच्या वड्या पाडण्याकरता चौकोनी तुकडे होतील अश्या चिरा मरून घेणे. चिक्की पूर्णपणे थंड झाल्यावर काढून बंद डब्यात ठेवणे.

Comments