अपसाईड डाऊन एपल रेझिन्स केक / upside down raisins cake




साहित्य –

१. सफरचंद १
२. मनुका अर्धी वाटी
३. पिठी साखर सव्वा वाटी
४. अंडी २
५. व्हनीला इसेन्स अर्धा चमचा
६. बदाम पूड पाव वाटी
७. बेकिंग पावडर १ छोटा चमचा
८. पाऊण वाटी वितळलेले बटर
९. दालचिनी पावडर अर्धा चमचा
१०. मैदा २ वाटी
११. पाणी अर्धी वाटी 

कृती –

केक साठी एक नॉनस्टिक भांडे मंद gas वर ठेऊन त्यात पाव वाटी साखर वितळवून घ्यावी. त्यात सफरचंदाचे तुकडे कापून टाकावे. मनुका टाकून लगेच अर्धी वाटी पाणी टाकावे. ३-४ मिनिटे शिजू द्यावे. पाणी आटू द्यावे. एका भांड्यात अंडी व उरलेली पिठी साखर बिटरने चांगली फेसून घ्यावी. त्यात इसेन्स व दालचिनी पूड टाकून एकत्र करावे. एका चाळणीत मैदा, बदाम पूड, बेकिंग पावडर एकत्र चाळून अंड्याच्या मिश्रणात टाकावे. हलक्या हाताने मिक्स करून वितळलेले बटर टाकून एकत्र करून gas वरील केकच्या भांड्यात मिश्रण ओतावे. एकदम बारीक gas वर १५-२० मिनिटे केक शिजू द्यावा. नंतर केक पालथा करून सर्व्ह करावा. 

Comments