चिकन लझानिया / chicken lasagna




साहित्य –

१. चिकन खिमा १ पाव
२. टमाटे ५
३. कांदे २
४. आले-लसूण पेस्ट १ चमचा
५. मोझेरेला चीज १५० ग्रॅम
६. तिखट अर्धा चमचा
७. मीठ चवीनुसार
८. लझानिया शीट्स ८
९. ऑलीव्ह ऑईल ४ चमचे
१०. बटर ३ चमचे 

कृती –

एका भांड्यात भरपूर पाणी उकळायला ठेवणे. पाणी उकळायला लागले की त्यात लझानिया शीट्स टाकून ३ मिनिटे शिजवून घेणे. २ मिनिटांनी त्या बोटाने दाबून पाहणे. शिजल्यास gas बंद करून शीट्स काढून त्याला त्याला तेल लावून एका ताटात पसरवून ठेवणे. जेणेकरून त्या एकमेकांना चिकटणार नाही. आता एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतवून घेणे. परतल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट टाकून १ मिनिट शिजू देणे. मग तिखट टाकून टमाट्याची पेस्ट करून टाकणे. ३-४ मिनिटे शिजू देणे. मग खिमा चांगला धूवून त्यात टाकणे. मीठ टाकून ३ मिनिटे शिजू देणे. हे मिश्रण पातळच राहू देणे. मग gas बंद करणे. आता एका मायक्रोवेव्ह प्रुफ काचेच्या चौकोनी भांड्याला आतून बटर लावून ग्रीस करून घेणे. आता त्यात वरील मिश्रणातील ३ चमचे मिश्रण पसरवणे. त्यावर २ शीट्स ठेवणे. त्यावर परत मिश्रण पसरवणे. त्यावर चीज किसून सगळीकडे पसरवून टाकणे. त्यावर परत शीट्स ठेवणे. वरती मिश्रण पसरवणे व चीज पसरवणे. अश्या प्रकारे एकावर एक थर रचणे. सर्वात वरती भरपूर चीज पसरवून टाकणे. शेवटी भांड्याच्या चारही साईडने थोडे थोडे बटर सोडणे. व मायक्रोवेव्ह मध्ये हाय मोड वर २०-२५ मिनिटे ठेवणे. वरून पाहत राहणे. जर झाले असे वाटल्यास मायक्रोवेव्ह बंद करणे. लझानिया गरम गरम चौकोनी कापून सर्व्ह करणे.     

Comments