टोर्टेलिनी विथ चिकन सूप / tortellini with chicken soup


साहित्य-
१. मैदा दीड वाटी
२. चिकन खिमा अर्धा पाव
३. कांदा १
४. पालकाची पाने ५
५. कोथिंबीर २ चमचे
६. काळी मिरीपूड अर्धा चमचा
७. बेसिल लीव्ह्स पाव चमचा
८. ऑरेगानो अर्धा चमचा
९. बटर २ चमचे
१०. पाणी आवश्यकतेनुसार
११. शिमला मिरची अर्धी
१२. मशरूम्स ४
१३. tomato सॉस १ चमचा
१४. हीरवी मिरची ३
१५. लसूण पाकळ्या १०
१६. मीठ आवश्यकतेनुसार
१९. दुध आवश्यकतेनुसार
कृती-

प्रथम चिकन खिमा, चिरलेला पालक एका भांड्यात घेऊन त्यात दीड कप पाणी टाकून तो ५ मिनिटे (त्याचा रंग पांढरा होईपर्यंत) पाण्यात उकळून घ्यावा. मग एका गाळणीने गाळून त्यातील सर्व पाणी काढून वेगळे करावे. एका पातेल्यात १ चमचा बटर घेऊन ते गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून २ मिनिटे परतावे. मग बारीक चिरलेला लसूण टाकून २ मिनिटे परतावे. आता त्यात खिमा टाकून ढवळून घ्यावे. त्यात मीठ, ऑरेगानो, बेसिल लीव्ह्स, मिरपूड टाकून पूर्णपणे कोरडे होऊ द्यावे व कोथिंबीर टाकून gas वरून उतरवून घ्यावे. आता परातीत मैदा घेऊन त्यात मीठ टाकून तो दुधाने भिजवावा. घट्ट गोळा करून त्याच्या छोट्या छोट्या पातळ पुर्या लाटुन घ्याव्या. एका पुरीच्या मधोमध १ चमचा खिम्याचे मिश्रण ठेऊन त्याला करंजीसारखे फोल्ड करावे. त्याचे काठ दाबून घ्यावे. आता त्याचे दोन बाजूकडील टोक एकमेकांना मागील बाजूने जोडून घ्यावे. अश्याप्रकारे सर्व टोर्टेलिनीज  तयार करून घ्यावी. एका भांड्यात ५ कप पाणी घेऊन त्याला उकळी आणावी. उकळल्यावर त्यात टोर्टेलिनी टाकून १० मिनिटे शिजू द्यावे. व काढून बाजूला ठेवावे. आता त्याचा सॉस करण्यासाठी एका पातेल्यात १ चमचा बटर गरम करून त्यात बारीक चिरलेली मिरची तडतडू द्यावी. मग त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची व लसूण, मशरूम चे उभे केलेले काप, चांगले परतवून घ्यावे. आता त्यात खिमा शिजवलेले पाणी व tomato सॉस टाकून मीठ टाकावे. उकळी आल्यावर त्यात शिजवलेले टोर्टेलिनी टाकून gas बंद करावा व गरम गरम सर्व्ह करावे.  

Comments