ओल्या हळदीचे लोणचे / turmeric pickle





साहित्य - 

१. ओली हळद १ पाव
२. लोणचे मसाला पाव वाटी
३. २ लिंबाचा रस
४. तेल अर्धी वाटी
५. मीठ चवीनुसार   

कृती - 

ओली हळद धून कोरडी करून घ्यावी. हातात प्लास्टिकचे ग्लोव्हज घालून त्याची साले काढून किसून घ्यावी. आता त्यात लिंबाचा रस, अंदाजे २ चमचे मीठ घालून ठेवावे. एका कढल्यात तेल गरम करून थंड करावे. त्यात मसाला टाकून मिक्स करावे. हे तेल हळदीत घालून एकत्र करून बरणीत भरावे. २-३ दिवस लोणचे खाली वर हलवावे. हे लोणचे लगेच मुरते.

Comments