मालवणी कोळंबी फ्राय / malvani prawns fry
साहित्य –
१.
कोळंबी १५ मोठ्या आकाराचे
२.
मालवणी मसाला २ चमचे
३.
लसूण पाकळ्या (सालासकट) ७-८
४.
आले पेस्ट अर्धा चमचा
५.
तिखट अर्धा चमचा
६.
मीठ चवीनुसार
७.
लिंबू अर्धे
८.
तेल ४ चमचे
९.
धने पूड १ चमचा
१०.
हळद पाव चमचा
११.
कोथिंबीर पाव वाटी
कृती –
प्रथम
कोळंबी स्वच्छ धून साफ करून घेणे. पूर्ण पाणी निथळून टाकणे. त्यात आले पेस्ट,
तिखट, हळद, मीठ, लिंबू, धने पूड, मालवणी मसाला टाकून एकत्र करणे. व एक तास झाकून
फ्रीज मध्ये ठेऊन देणे. आता एका कढईत तेल तापवून त्यात लसूण सोडणे. लसूण चांगला
फ्राय झाल्यावर त्यात कोळंबी सोडणे. आता ५ मिनिटे झाकण न ठेवता होऊ देणे. कोळंबी
पूर्ण कोरडी होऊ देणे. कोथिंबीर पेरून सर्व्ह करणे.
Comments
Post a Comment