लेमनी श्रिम्प रिसोतो / Lemony shrimp risotto
साहित्य –
१. कोळंबी ७-८ मोठे सोललेले
२. ओलिव्ह ऑइल ६ चमचे
३. हिरव्या मिरच्या ३
४. बेजिल लीव्ह्स पाव अर्धा चमचा
५. हिरवे वाटाणे अर्धी वाटी
६. चिकन स्टॉक अर्धा
लिटर
७.
बटर २ चमचे
८.
पर्मेजानो चीज ३ चमचे
९.
लसूण चिरलेला १ चमचा
१०.
एका लिंबाचा रस
११.
लिंबाच्या वरील सालचे बारीक लांब काप सजवण्याकरिता
१२.
व्हाईट वाईन १ कप
१३.
३ कांद्याची पात
१४.
कांदा १
१५.
तांदूळ दीड वाटी
कृती –
कोळंबी धुवून २ चमचे ऑलिव्ह
ऑईल मध्ये २ मिनिटे भाजून बाजूला ठेवावे. एका कढईत उरलेले ४ चमचे तेल घेऊन त्यात
लांब चिरलेल्या मिरच्या, लसूण टाकून वाटाणे, चिरलेला कांदा परतावा. आता त्यात
तांदूळ टाकावा. तांदूळ थोडा पारदर्शक होईपर्यंत परतावा. वाईन व स्टॉक टाकावा.
१० मिनिटे शिजू द्यावे, आवश्यकतेनुसार पाणी टाकत जावे. आता कोळंबी, बेजील लीव्ह्स,
कांद्याची पात, लिंबाचा रस टाकून शिजू द्यावे. रिसोतो कोरडा होता कामा नये. १०-१५
मिनिटे शिजू द्यावे. रीसोतो अर्धवट शिजवतात. मऊ होऊ देऊ नये. शेवटी बटर व चीज
टाकून ढवळावे. सर्व्ह करताना लिंबाच्या सालीने सजवावे.
टीप
–
रिसोतो
साठी इटालियन तांदूळ (अर्बोरिओ) वापरतात. तो नसेल तर दुसरा कुठलाही तांदूळ वापरला
तर चालतो.
Comments
Post a Comment