रव्याचा केक ( suji cake)



साहित्य - 
 
१. रवा २ ते अडीच वाटी 
२. पिठी साखर १ वाटी
३. मीठ पाव छोटा चमचा 
४. व्हॅनिला इसेन्स पाव छोटा चमचा
५. तेल पाव वाटी 
६. दही १ वाटी 
७. बेकिंग सोडा एक चमचा 
८. बेकिंग पावडर एक छोटा चमचा 
९. काजूचे तुकडे पाव वाटी

कृती - 
एका भांड्यात दही घेऊन त्यात पिठीसाखर, मीठ, तेल, व्हॅनिला इसेन्स घेऊन फेटून घेणे. मग त्यात मावेल असा रवा टाकणे. मिश्रण ढोकळ्याच्या पीठाईतके सरबरीत असावे. आता त्यात काजूचे तुकडे टाकून एकत्र करावे. एका अल्युमिनियमच्या भांड्याला तेल लावून ग्रीस करावे. त्यात बटरपेपर टाकून परत त्यावर तेल लावावे. मायक्रोवेव्ह प्रिहीट करून घ्यावा. आता मिश्रणात सोडा व बेकिंग पावडर टाकून नीट एकत्र करून मिश्रण भांड्यात टाकावे. आता केक १८० डिग्री वर ४० मिनिटे बेक करावा. 

Comments