आंब्याचे आईसक्रिम / mango icecream




साहित्य –
१. हापूस आंबे ३
२. साखर १ वाटी
३. व्हिपिंग क्रीम २ वाटी (साखर युक्त)
४. व्हानिला इसेन्स अर्धा चमचा
५. आंब्याचे छोटे तुकडे अर्धी वाटी 

कृती –
आंबे धून चिरून ते मिक्सर मध्ये साखरेबरोबर फिरवून पेस्ट करून घेणे. व्हिपिंग क्रीमला बिटरच्या साहाय्याने हलके होईपर्यंत ५ मिनिटे बीट करून घेणे. त्यात आंब्याची पेस्ट, व्हानिला इसेन्स टाकून एकत्र करून घेणे. आता फ्रीझर मध्ये हाय टेम्परेचर करून ठेऊन देणे. ५-६ तासांनी परत त्याला एकदा बीट करून परत फ्रीझर मध्ये सेट करायला ठेवणे. रात्रभर सेट होऊ देणे. सर्व्ह करताना वरून आंब्याचे छोटे छोटे तुकडे टाकून सजवणे.

Comments