कचोरी / kachori


साहित्य-
१. मैदा १ पाव
२. मुगाचे दाणे १ वाटी
३. लसूण पाकळ्या ८
४. हळद पाव चमचा
५. मिरच्या ७-८
६. मीठ चवीनुसार
७. धने - जिरे पूड २ चमचे
८. बडीशेप २ चमचे
९. बेसन ३ चमचे
१०. तेल आवश्यकतेनुसार
११. ओवा १ चमचा
१२. चिंचेची चटणी अर्धी वाटी
१३. कांदे २
१४. बारीक शेव १ वाटी
१५. दही १ वाटी
कृती-
मैदा चाळून त्यात मीठ व ओवा टाकावा. त्यात पाव वाटी गरम तेलाचे मोहन टाकून पाण्याने घट्ट भिजवावे. दाणे १ चमचा तेलावर थोडेसे परतून घेणे. बेसन भाजून घेणे. मिक्सर मध्ये मिरच्या, दाणे, लसूण, बडीशेप टाकून बारीक करून घेणे. ह्या मिश्रणात भाजलेले बेसन, मीठ, हळद, धने - जिरे पूड टाकून हाताने चांगले एकत्र करून घेणे. आता मैद्याचा लिंबाएवढा गोळा लाटून त्यात थोडेसे सारण भरून बंद करावा. आता हलक्या हाताने पोळपाटावर लाटण्याने लाटावे. व गरम झालेल्या तेलात सोडावे. gas मंद वर ठेवून कचोरी होऊ द्यावी. कचोरी होत असताना त्यावर वरील बाजूस गरम झालेले तेल सोडत राहावे. म्हणजे कचोरी फुगेल. कचोरी दोन्ही बाजूनी लालसर तळून घ्यावी. व गरम गरम कचोरी वर दही, चिंचेचा सॉस, बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा टाकून सर्व्ह करावी.
टीप-
याप्रमाणे ओले वाटण्याच्या सुद्धा कचोऱ्या करता येतात.

Comments